दत्ता ढगे – शिवआर्मी शेतकरी संघटना
“जनतेसाठी काम, परीवर्तनासाठी लढा “

🌾 शेतकरी मार्गदर्शन व सिंचन मदत

👨‍🎓 युवकांना मार्गदर्शन व कौशल्य विकास

👩‍🦰 महिलांसाठी सक्षमीकरण उपक्रम

🏥 आरोग्य सहाय्य व सामाजिक मदत

🌱 पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण

समाजात काही जण सत्तेसाठी धडपडतात, तर काही जण समाजबदलासाठी संघर्ष करतात. हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तो आहे विचारांचा, सेवेचा आणि संपूर्ण पिढीच्या आवाजाचा.

बालपण आणि पार्श्वभूमी

बालपणी त्यांनी पाहिलं — शेतकरी दिवसभर परिश्रम करूनही कर्जाच्या ओझ्यात दबलेला; शिक्षण घेऊनही नोकरीची खात्री नसलेल्या तरुणांची धडपड; आणि रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मुलभूत सुविधांसाठी लोकांना वारंवार शासनाकडे धाव घेताना. या वास्तवाने त्यांच्या मनात एकच संकल्प रोवला — “केवळ परिस्थितीचं वर्णन नको, बदल घडवायचा आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका – जो सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परंपरेसाठी ओळखला जातो – इथल्या शेतकरी कुटुंबात दत्तात्रय ढगे यांचा जन्म झाला. गावाकडच्या साध्या, कष्टमय वातावरणात त्यांनी लहानपण घालवले. शेतातील श्रम, उन्हातान्हात केलेली कष्टाची साधना हीच त्यांची पहिली शाळा होती.

🎓 शिक्षण आणि तरुणाईतील घडण

दत्ता ढगे यांनी शिक्षण घेताना केवळ पाठ्यपुस्तकांपुरता अभ्यास न करता सामाजिक वास्तवाचे भान जपले. विद्यार्थीदशेतच त्यांनी समाजहिताची दृष्टी विकसित केली. याच काळात त्यांनी छात्रभारती या स्वतंत्र विद्यार्थी संघटनेत प्रवेश केला. कोणत्याही राजकीय पक्षाशी असंबद्ध असल्यामुळे, या मंचातून त्यांनी सत्तेची नव्हे तर समाजपरिवर्तनाची वाट निवडली.

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रिया, परीक्षा, वसतिगृहव्यवस्था आणि विविध शैक्षणिक समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. अन्यायाविरुद्ध निर्भीड भूमिका घेणे, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी मार्गदर्शन करणे आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग देणे—यामुळे ते लवकरच विद्यार्थी चळवळीतील ओळख निर्माण करणारे प्रभावी तरुण नेता बनले.

🏛️शिवआर्मी शेतकरी संघटना

दत्ता ढगे शिवआर्मी शेतकरी संघटनेत सक्रिय भूमिकेत कार्यरत आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वीज, सिंचन, उत्पादनखर्च आणि किमतीसंबंधी समस्यांवर ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या चळवळी आक्रमक असल्या तरी त्या लोकशाही पद्धतीवर आधारित आहेत आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रचनात्मक मार्गाने लढा देण्याचे त्यांनी नेहमीच धोरण ठेवले आहे.

✊सामाजिक आणि संघटनात्मक प्रवास

शिक्षण घेत असताना दत्ता ढगे यांनी समाजकार्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले. ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगार युवक आणि स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम सुरू ठेवले. आंदोलन, जनजागृती मोहिमा, निवेदने आणि विचारमंथन सत्रांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढा दिला आणि लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सेतूची भूमिका निभावली.

✊उल्लेखनीय आंदोलन

🔥📘Long March विद्यार्थी शिक्षकाच्या प्रश्नावर छात्रभारतीचा लाँग मार्च

दिनांक : १५ मार्च २०१८
स्थळ : पुणे ते मुंबई

💡सिंगल फेज लाईट आंदोलन – आडवा ओढा, संगमनेर

दिनांक : मार्च २०११
स्थळ : आडवा ओढा, संगमनेर

गावातील विद्यार्थ्यांना रात्री अभ्यासासाठी वीज मिळत नव्हती. यासाठी त्यांनी नाशिक–पुणे महामार्गावर “हायवे प्रकाशात अभ्यास” या अनोख्या आंदोलनाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी हायवेवरील वाहनांच्या दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करून शासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाने स्थानिक प्रशासन आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आणि अखेरीस वीजपुरवठा सुधारण्याची प्रक्रिया सुरू झाली.

🎓 OBC स्कॉलरशिप साठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षाब बंगल्याच्या दारात आंदोलन, ७ दिवस कारावास

दिनांक : फेब्रुवारी २०१४
स्थळ : वर्षा बंगला, मुंबई

📝आदिवासी विद्यार्थांचा DBT चा प्रश्न सुटावा यासाठीचा संघर्ष …

दिनांक : जुलै २०१८
स्थळ : राळेगण सिद्धी

📄११वी प्रवेश प्रक्रिया तपासणी समितीचे प्रशिक्षण – राळेगण सिद्धी …

दिनांक : २० जुलै २०१६
स्थळ : राळेगण सिद्धी

🎉खांडगाव यूथ फेस्टिवल – फेब्रुवारी २०११

ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना आणि मराठी संस्कृतीला वाव मिळावा यासाठी खांडगाव युथ फेस्टिवलचे आयोजन….

💰शिवआर्मीच्या माध्यमातून कोरोनाकाळात जिवनावश्यक वस्तू नागरिकांना दिल्या..

दिनांक : मे २०२०
स्थळ : शहर परिसर व उपनगरातील गरजू भाग

कोविड-१९ महामारीच्या काळात, संपूर्ण देश लॉकडाउनमुळे ठप्प झाला असताना जनतेच्या अडचणी ओळखून दत्ता ढगे यांनी शिवआर्मीच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये आणि शहरी भागात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले. या उपक्रमांतर्गत अन्नधान्य, किराणा, औषधे, सॅनिटायझर आणि मास्क यांचे वितरण करण्यात आले. अनेक गरजू कुटुंबांना वेळेवर मदत मिळाल्यामुळे या सामाजिक कार्याचे नागरिकांनी मनापासून स्वागत केले.

[expander_maker id=”2″ more=”” less=”माहिती कमी करा” class=”rmwr_btn”]

१. गडकिल्याचे हॉटेल मध्ये रूपांतर करण्याच्या निर्णया विरोधात पेमगिरी येथील शहागड वरुण मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचा कडेलोट करून निषेध आंदोलन

दिनांक : जुलै २०१९
स्थळ : शहागड किल्ला

२. संगममेर प्रांत कार्यालयात भाकड गाई आणि गोऱ्हे सोडून दुध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्नाला वाचा फोडली….

दिनांक : मार्च २०२५
स्थळ : संगममेर प्रांत कार्यालय

३. पंचायत राज समीतीसमोर छात्रभारतीचे आंदोलन, संगमनेर

छात्रभारतीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन

दिनांक : १२ मार्च २०१२
स्थळ : पंचायत राज समिती कार्यालय, संगमनेर

विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्यांसाठी छात्रभारती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंचायत राज समितीच्या बैठकीदरम्यान संगमनेर येथे जोरदार आंदोलन केले. आंदोलनात कॉलेजमधील अन्यायकारक फी वाढ, सुविधांचा अभाव आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या समस्या यावर ठोस भूमिका मांडण्यात आली. दत्ता ढगे यांनी या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देत “विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या मान्य झाल्याशिवाय गप्प बसणार नाही” असा इशारा प्रशासनाला दिला.

४. आडवा ओढा बस भाडे कमी करणेबाबत – डिसेंबर २०१५ 📜

दिनांक : १२ डिसेंबर २०१५
स्थळ : आडवा ओढा बस स्टॉप परिसर

५. दुधाचे भाव २५ रुपयांपेक्षा खाली गेले असता, चिखली येथे रास्ता रोको आंदोलन करून सरकारला जाब विचारला परिणामी सरकारने किमान बजार 30 रुपये निश्चित करुन ५ रुपये अनुदान असे ३५ रुपये दिले..

दिनांक : ऑगस्ट २०१४
स्थळ : चिखली

६. विद्यार्थ्यांनीचे पैसे परत न केल्याने छात्रभारतीचे महाविदयालय गेट बंद आंदोलन – डिसेंबर २०१५

संगमनेर महाविदयालय प्रशासनाकडून विद्यार्थांना धमकी- बेकायदा फी प्रकरण

दिनांक : डिसेंबर २०१५
स्थळ : महाविद्यालय प्रवेशद्वार

महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे छात्रभारती संघटनेने महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेटबंद आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी केली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करत “न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही” अशी घोषणा दिली. दत्ता ढगे यांनी या आंदोलनाला थेट पाठिंबा देत विद्यार्थ्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी चर्चाही केली. परिणामी काही विद्यार्थ्यांना तत्काळ परतावा मिळाला.

[/expander_maker]

🗞️बातमी आणि उपक्रम

📢 विविध सामाजिक उपक्रमांची झलक …

📞संपर्क करा

📄शेतकरी मुला-मुलींसाठी विवाह नोंदणी फॉर्म

लिंग (Gender) :
कुटुंब प्रकार :
शिक्षण (Highest Qualification) :
व्यवसाय (Occupation Details):
विवाह स्थिती :
योग्य जोडीदाराबद्दल अपेक्षा (Partner Preferences):
दिलेली माहिती खरी आहे अशी मी घोषणा करतो/करते.
लग्न जुळवण्यासाठी माझी माहिती संघटनेला शेअर करण्यास संमती देतो/देते.

📩संपर्क माहिती

“आपल्या सेवेत सदैव तत्पर – दत्ता ढगे, संवादातून जोडलेले नातं.”
➤ संवाद, सेवा आणि नातं या तीन गोष्टींवर भर.

-आपला दत्ता ढगे

📍पत्ता: शिवआर्मी कार्यालय, अकोले बायपास, ईदगाह मैदान शेजारी, संगमनेर -४२२६०५

✉️ ईमेल: datta.dhage1@gmail.com

📞मोबाईल नंबर: +९१ ७४४७८ ४४१३१

🕒ऑफिसचे वेळापत्रक

सोमवार ते शनिवार – सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.००

रविवार – बंद